(पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.)
केशवाचे कपट, काकांची कमाल
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचर्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचर्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार -
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेचि कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे!!
कथा - कु. शंतनु भट
Wednesday, February 4, 2009
Sunday, July 13, 2008
पोपटपंची - २
(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)
पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण
(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पोपटपंची - 1)
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.
पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.
पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.
पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.
पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.
पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
- (पटकथा - पुष्कर ऊर्फ शंतनु भट)

पोपटपंची - १
पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.
पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.
पंतांना परमेश्वरच पावला!
-( पटकथा - पुष्कर ऊर्फ शंतनु भट)

Saturday, April 5, 2008
7-8-9
नुकतंच मिसळपाववर (www.misalpav.com) सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९.
हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही. खूप कमी कालावधीत (माझ्या परिचयातील लोकांत) लोकप्रिय झालेला हा खेळ. त्याच्याबद्दल इथे देखिल लिहिण्याचा मोह अनावर झाला आहे.
एखादा खेळ प्रत्यक्ष खेळून दाखवूनच शिकवावयास हवा. तो कसा खेळायचा हे वाचणं कंटाळवाणेपणाचं होईल, हे मला माहित आहे. पण तरीदेखिल मी हे देत आहे. सध्या मिपावर,मनोगतावर, उपक्रमवर तसंच अन्य काही वेब साईट्स वर, टिव्हीवर, पुस्तकांमध्ये काही काही पदार्थांच्या पाककृती लिहिल्या जात आहेत. त्याप्रमाणे काही उत्साही मंडळी ते करूनही पाहतात. ही "खेलकृती" सुद्धा एकवार आजमावून पहावी. सुरुवातीला खेळ समजवयास वेळ लागेल, पण एक-दोनदा खेळलत की मग तो समजायला सोपा जाईल. एकदा का डाव जमू लागला, कि त्यासारखी दुसरी मजा नाही.
७-८-९ आणि ७-८ ह्या खेळांचा काही संबंध नाही. ७-८-९ हा थोडा रम्मी सारखा आणि फार 'उनो' सारखा आहे. ७--८--९ ही पत्त्यांमधली जणू ट्वेंटी-ट्वेंटी आहे. खेळताना खूप मजा येते.
ह्याला कोणतीही पाने वर्ज्य नाहीत. पाच-पाच पाने वाटून डाव सुरू होतो. हातातले गुण कमित कमी ठेवणे हे मुख्य उद्दिष्ट. रम्मी प्रमाणे मध्ये उरलेल्या पानांचा गठ्ठा ठेवायचा. रम्मीच्या उलट खेळायचे, म्हणजे आधी हाततले पान टाकायचे आणि मग गठ्ठ्यातून उचलायचे.पानांच्या जोड्या टाकायला परवानगी आहे. (२ एक्के, २ गुलाम इ. ; राजा-राणी ही जोडी नाही). तसेच ३ किंवा जास्त पानांचा सिक्वेंस टाकू शकतो. घेताना मात्र एकच पान उचलायचे.
सत्ती, आठ्ठी, नश्शी ही ह्या खेळाची मुख्य हत्यारं. समजा एखाद्याने सत्ती टाकली, तर त्याच्या पुढच्या भिडूने काहीही न खेळता समोरच्या गठ्ठ्यातून २ पाने उचलायची आणि त्याच्याही पुढच्या भिडूने नेहमीप्रमाणे खेळ चालू ठेवावा. एखाद्याने आठ्ठी टाकली, तर ज्या क्रमाने खेळ चालत आला, त्याच्या उलट सुरु करावा (क्लॉकवाईज खेळत असाल तर अँटीक्लॉकवाईज). एखाद्याने नश्शी टाकली, तर त्याच्या पुढचा भिडू एकावेळेसाठी स्किप (थोडक्यात, त्याची एक उतारी चुकते).
एक्क्याला १, दुर्रीला२, अश्या क्रमाने दश्शीला १० गुण. सर्व चित्रांना १०-१० गुण असतात.
डावाचा शेवट हा खेळाडूंच्या मनावर असतो. जर एखाद्याला असे वाटले की आपल्या हातात सर्वांपेक्षा कमी गुण आहेत, तर त्याने त्याची उतारी आल्यावर उतारी करण्यापूर्वी "शो" करावा. तो जर बरोबर निघाला, तर त्याला ० गुण आणि इतरांचे जे झाले असतील तेगुण लिहावेत. प्रत्येक डावात गुणांची बेरीज करत रहावे. जो २५० चा टप्पा पार करेल, तो खेळातून बाहेर. उरलेले भिडू खेळ चालू ठेवतील. अश्या रितीने एक एक गडी कमी होत शेवटी जो एक राहील तो जिंकला.
मुख्य लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हातात कमी पाने ठेवणे हे उद्दिष्ट नसून कमी गुण ठेवणे हे आहे.
ह खेळ १ पेक्षा जास्त कितीही जणांत खेळता येतो. ४ पेक्षा जास्त जण असतील तर जास्त कॅट घ्यावेत.
एकदा हा खेळ जमू लागला, की तो व्यसन लावतो. वर्षानुवर्षे मेंढीकोट खेळणार्यांचा सवयी ह्याने मोडल्या आहेत.कोणाला अधिक माहिती हवी असेल ह्या खेळाबद्दल, तर मला कळवा.

Thursday, January 31, 2008
भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात. तर सध्या,) भाऊंच्या ओळी जश्या आहेत तश्याच आपल्यासमोर (तुमच्यासमोर) ठेवत आहे. (आठवून लिहितो आहे, एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर लगेच कळवा).
जाणकारांना सांगण्याची गरज नाही तरीही एक सुचवू इच्छितो (आम्ही पडलो 'सल्लेखोर' स्वभावाचे!) गझल्/चारोळी वाचताना ह्याक्रमाने वाचाव्या- पहिल्या दोन ओळी सलग, मग पुन्हा त्याच ओळी, मग फक्त तिसरी ओळ दोनदा (इथे चौथ्या ओळीविषयी उत्सुकता ताणली गेली नसेल तर उसनी आणावी. अर्थात भाऊंच्या चारोळ्या ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाहीत) आणि शेवटी चौथी ओळ (एकदाच. ती कशाला दोनदा वाचायची?). हा प्रयोग खालच्या ओळी वाचताना करून पहा, मजा येईल वाचताना.
दोस्त हो,
पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे
पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले
वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले
पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा
माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा
सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे?

Friday, December 21, 2007
आम्ही कोण
आम्ही कोण म्हणूनि काय पुसता
आम्ही उद्याचे रवी
उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे
आव्हान-क्षेत्रे नवी
संचारू मनसोक्त वायुलहरीं-
वरती पुन्हा एकदा
पादाक्रान्त करूनि टाकु सगळी
धरती पुन्हा एकदा
(आमची प्रेरणा- केशवसुतांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके"
आणि केशवकुमारांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी")

विष्णुगुप्त - १
सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता.
पण विष्णूला या कशाचच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत्त्वाचा दिवस होता. इतका अपार आनंद, एवढा उत्साह आणि इतकी पराकोटीला गेलेली उत्सुकता त्याने यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. शेवटी न राहवून त्याने समोरून येणार्या गृहस्थाला विचारलं,"महाशय, कृपया मला तक्षशिला विद्यालयाकडे कोणता मार्ग जातो, ते दाखवाल का?"
त्या गृहस्थाने एकदा विष्णूला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळलं. अनेक दिवसांच्या प्रवासाने शिणलेली काया, जीर्ण वस्त्र, खांद्यावर अडकवलेली तुटपुंज्या सामानाची झोळी पण चेहरा मात्र अत्यंत तेजस्वी, शोधक नजर असलेले बोलके डोळे, तरतरीत नाक, मोठ्ठं कपाळ आणि डोक्यावरून रुळणारी शेंडी अश्या त्या किशोरवयीन मुलाला पाहून त्या गृहस्थाला मोठी गंमत वाटली. लगेचच योग्य त्या दिशेला त्याने अंगुलीनिर्देश केला. "धन्यवाद महाशय", विष्णु म्हणाला. "शुभास्ते पंथानः", त्या पथिकाने जाता जाता आशिर्वाद दिला. पण ते ऐकायला विष्णूला वेळ कुठे होता? त्याचा अंगुलीनिर्देश पाहताच विष्णूने त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवातही केली होती.
तक्षशिला विश्वविद्यालय जसं जवळ येत चाललं तशी विष्णूच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढायला लागली. पावलांबरोबरच हृदयाच्या ठोक्यांची गतीही वाढली. डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसू लागली."तक्षशिला! माझं किती दिवसांपासूनचं स्वप्न! या विश्वविद्यालयात केवळ आर्यावर्तातूनच नव्हे तर इतर राष्ट्रांमधूनही अनेक विद्यार्थी विद्यार्जनासाठी येतात म्हणे. इथले आचार्यसुद्धा अतिशय कुशल, बुद्धिवान, अनेक विषयांमध्ये पारंगत. कशी असेल इथली शिक्षणव्यवस्था? कसे असतील इथले विद्यार्थी? त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच विचार असलेले, आपल्याशी मिळताजुळता स्वभाव असलेले मित्र आपल्याला मिळतील का? ह्या विद्यालयात सर्व चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचं शिक्षण एका वेळी कसं चालत असेल? इथे आचार्य तरी किती असतील?" अश्या कितीतरी प्रश्नांनी विष्णूच्या मनात काल रात्रीपासून कोलाहल माजवला होता आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ समीप येऊन ठेपली होती.
चालता चालता विष्णू नगराच्या बर्यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला.
त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे."

Subscribe to:
Posts (Atom)