Posts

Showing posts from February, 2009

कोल्हे-कुई

(हे लेखन कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, माझ्याही नकळत कोणीतरी ढकलपत्रांमध्ये (इ-मेल) तसंच्या तसं कॉपी केलेलं मला आढळलं आहे. (कोणीतरी मलाच माझी ही कथा मेल केली). मी माग काढत गेलो तेव्हा ते IIT Bombay मधून पसरल्याचं समजलं. ही कथा संपूर्णपणे माझी स्वत:ची आहे याची नोंद घ्यावी.) ( पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचर्‍यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. क...