निबंध: गाय - व्याकरणिक दृष्ट्या उपयुक्त पशु
खरं तर विषय 'माझा आवडता प्राणी - गाय' हा आहे, परंतु ते संशोधन अगोदर प्रकाशित झाल्यामुळे (Review by Pandit V., 2012) तसलंच संशोधन वेगळ्या नावाखाली प्रकाशित करायचा हा खटाटोप. ह्यातील काही कल्पना Pandit V., Pundalik R., Kher A., Kane M., Pranajape C. यांच्याकडून घेतल्या आहेत त्यांचे सुरवातीच्या बिगिनिंगमदी यक्नोलेज्मेंटला आभार मानतो. आता गाय आणि व्याकरण या विषयांकडे वळूया. गाय हा शब्द संस्कृतातील 'गौ' या शब्दावरून आला असा प्रवाद अनेक वर्षे प्रचलित आहे (Kane M.). किंबहुना बऱ्याच प्राण्यांची नावे संस्कृतातून आल्याचा दावा लोक करतात. पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. कारण विविध भाषांचा अभ्यास करता असं लक्षात येईल कि इंग्रजीमधील 'GUY' ह्या शब्दाचा उच्चार गायीशी सगळ्यात जवळचा आहे (Pandit V.). संस्कृतमध्ये गौ मधल्या 'औ' चे रुपांतर 'आव' असे होते हि गोष्ट हि मंडळी सोयीस्करपणे विसरतात. तर हा शब्द इंग्रजीमधून आला असून तिकडे मुलांना गाय म्हणण्याचे कारण पूर्वी तिकडे गाय ह्या पशूचे पालन होत असे. सकाळी सकाळी गवळी गोठ्यात जाऊन गायींना 'Hi guy...