Posts

Showing posts from March, 2014

हलकल्लोळ - ५: अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे

Image
मागील भागापर्यंत आपण हलकल्लोळ (Chaos)  आणि स्व-समानता (self similarity) या गोष्टींना हात घातला. पण आता जरा गाडी वेगळ्या विषयाकडे वळवू या. मागील भागाच्या शेवटी म्हणल्या प्रमाणे काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे बऱ्याच बर्षांपासून दूरदर्शनवर पौराणिक मालिकांची चलती आहे. पूर्वी कथा-कीर्तनामधून ऐकल्या जाणाऱ्या पौराणिक गोष्टी आपल्याला मालिका स्वरुपात पाहण्याचे एक भलते वेड आहे. आता नवीन मालिकांमध्ये तर लोकांची बदलती आवड पाहून गोष्टींना 'सांस-बहु' मालिकांप्रमाणे रूप आणले आहे. कोणीतरी अप्सरा कोणावर तरी डूख काय धरून असते, मूळच्या गोष्टी बदलून एखाद्या पात्राला दुसऱ्याच्या थोबाडीत मारायला लावतात आणि ती थोबाडीत तीनदा दाखवतात, त्या नंतर सगळे ऋषी, गंधर्व, देव, अप्सरा, राजे, राण्या, दानव यांचे चेहरे दाखवण्यात उरलेला भाग संपून जातो म्हणे! असो. ह्या पौराणिक मालिका पाहून मनात येणाऱ्या काही प्रामाणिक आणि मजेशीर प्रश्नांची जंत्री पाहायची असल्यास नक्की  इथे  भेट द्या. आज मात्र आपण एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करू, आणि त्या प्रश्नावरच आजचा भाग (ब्लॉगचा भाग, ...