Posts

Showing posts from 2021

रंगुनी रंगात सार्‍या

Image
(source: https://indiadailynews.in/typically-there-was-a-gathering-of-politicians-in-lalu-yadavs-kurtafad-holi-however-this-yr-rjd-staff-is-not-going-to-play-holi/) २००८ ची गोष्ट आहे. कामानिमित्त मुंबईला राहत होतो, तेव्हा एक मित्र मला म्हणाला 'परवा होळी आहे. येणार का रंगपंचमी खेळायला?' पुण्यात सदाशिव पेठेत बालपण घालवलेला मी ह्या प्रश्नावर साडेतीन ताड उडालो. माझ्यातला व्याकरण-नाझी जागा झाला. होळीला रंगपंचमी कशी काय? मुळात 'पंचमी' ही तिथी होळीपौर्णिमेनंतर ५ दिवसांनी येते त्यामुळे 'पौर्णिमेला पंचमी खेळणे' म्हणजे ख्रिसमसच्या रात्री फटाके उडवून हॅप्पी न्यु यिअर करणे किंवा संक्रांतीला ध्वजवंदन करून गणतंत्रदिन (चिरायू होवो वगैरे) साजरा करणे अशी क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. तो एक वेळ 'रंग खेळायला येतोस का' म्हणाला असता तर मला तितका धक्का बसला नसता, कारण एव्हाना मला 'होली'च्या दिवशी रंग खेळतात हे हिंदी चित्रपटात बघून आणि दरवर्षी नेमाने होळीच्या दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून येणार्‍या ढोलवादनरत रंगलिप्त मोदयुक्त अत्युल्लसित ...