तो आणि त्याची स्वप्नं
अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर हो हो, जरा डोळे बंद कर डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्यात तूच कधीतरी गोंदवलेलं त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू अरे तू फक्त सांग, तुला पाहिजे तसं घडेल तुझ्या खिडकीचं दार कदाचित दूरवरच्या गुहेत उघडेल त्या गुहेमध्ये अश्याच स्वप्नाळू लोकांची वस्ती आहे बाहेर काहीही घडो, त्यांना कुणाची धास्ती आहे? चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू ते बघ, तो पहिलास का? तिकडे एक निळा डोंगर आहे त्याच्याकडे जाणारी ती पायवाटसुद्धा किती ...