पहिले अक्षर


ए-काएकी कुठून कैशी
क-ल्लोळातुन उमटे ऐशी
ही-न स्वरांची शुभ्र रेष ती

अ-जाणत्या त्या विहरी वेली
क्ष-त्रपतीच्या कुरणावरुनी
र-विकुहरातील बनुनी छाया

स-रसावुनी मग येई रावा
म-रुभूमीकणघृत रगडाया
ज-राजीर्ण त्या जरासंध-सम
ल-चके समस्त एकवटाया

ना-द जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा


शब्दार्थ -

विहरी - विहरण करतात
क्षत्रपती - पृथ्वीपती
घृत - तेल
प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीतील
अधर दिशेने - (वरून) खालच्या दिशेने
बोधे - समजून

- शंतनु भट

Comments

Vishal said…
Ramdas swaminchya nantar tuch re !
शंतनु said…
ramdas - samartha
amhi - asamartha
अमृत said…
'अक्षर खेळ'

काय सांगू तुम्हास
ती साधी, भोळी गाय ग !
पिते पाणी, खाते पोळी
"आ" च्या आधी म्हणते 'अ'!

कुठेच नाही देते लक्ष
उगाच वेडे हसते रे..
बघते टकमक,
हसते खळखळ
ती कसली..
सांगू तुम्हास रे !

सवाल तुझा, तर हा जवाब
शेवट वाक्याचा स्विकार
करू नकोस उगाच का? का?
नकोच देऊस भलते शेरे..!!
Vishal said…
@Amrut : It goes for SIX !
Makarand MK said…
"शास्त्री" झाला शंतनू म्हणुनी
रमू लागला विचित्र कवनी

या बोलांसि काय म्हणावे
कवटाळावे वा फेकावे

अथवा केवळ विनोद मानून
"अक्षर(?)-अर्था(???)" सोडून द्यावे !!!
शंतनु said…
पहिला बाजीरावाबद्दल असं म्हटलं जातं, की त्याचा स्पीड एवढा भारी होता, की तो शत्रूच्या पिछाडीवर जाऊन हल्ला करायचा. अमृतनी माझ्यावर वाक्यांच्या पिछाडीवरून हल्ला केला आहे.
sahdeV said…
मी पण तुझ्याप्रमाणेच काहीतरी लिहून प्रतिक्रिया देणार होतो, पण "अमृत"नामक वल्लीने एवढं मस्त लिहिलं आहे, कि माझे काही धाडस होत नाही आता! तुम्ही दोघेही खूप भारी आहात!!! एक नंबर!!!!!
sahdeV said…
मला तू लिहिलेलं जास्त आवडलं मात्र!
शंतनु said…
Mak.. nakki kaay mhanaycha ahe tula??? tuza reply nehmi sarkha vatla nahi.. kadachit tu ti neet wachleli disat nahi. aso.
sahdeva, tu lihi re pahije to reply.. adhi kaay reply alet.. tyacha vichar nako karu.. anyways shanyawad.
शंतनु said…
ani hya kavitela (ekahi akshar samajla nahi.. sodun.. ankhin ek) artha ahe.. (odhun tanun ka hoi na.. pan artha anta yeto).
hee ek nisarga kavita ahe.

pahila kadva akashat chamaknarya vije baddal ahe. pavsachi chahul lagte ani vatavarnaat kase badal hotaat he kavite madhe ale ahe.

dusrya kadvyaacha artha mhanje.. hya pruthvipati (dev/nisarga etc) chya srushti madhe asha veli khup utsaha sancharto.

tisrya kadvyacha artha - hi srushti itki ek-jeev zali ahe.. ki tila kontahi element kitihi prayatna karun suddha vegle karu shakat nahi..
sahdeV said…
"अमृत" नामक लेखकाची प्रतिक्रिया वाखाणण्याजोगी असली तरी वाटली ती काहीशी ओढून ताणूनच/कमी अर्थपूर्ण.

तात्या! एवढे बाळबोध समजू नका आम्हाला! अर्थ कळला म्हणूनच म्हणालो कि तुझी कविता जास्त आवडली! अर्थपूर्ण होती आणि अर्थात पहिल्या अक्षराची गम्मत देखील होती.

(गम्मत करतोय, मला माहितीय हे तू सर्वसामान्य वाचकांना लक्षात ठेवून लिहिलयस ते :P yes, हा उगीच माज!)
sahdeV said…
आणि प्रतिक्रिया देतानादेखील google transliteration bookmarklet वापरलेत तर बरे!
sahdeV said…
असो... चावणं खूप झालं! तू लय भारी आहेस लेका!!!
Meghana said…
छान पोस्ट आहे.कविता आवडली आणि comments ची जुगलबंदीही ..
शंतनु said…
ठीक आहे. सहदेवाच्या आग्रहास्तव आता देवनागरीत लिहितो.
"आणि ह्या कवितेला (एकही अक्षर समजल नाही... सोडून.. आणखी एक) अर्थ आहे. (ओढून ताणून का होईना .. पण अर्थ आणता येतो). ही एक निसर्ग-कविता आहे.

पहिलं कडवं हे आकाशातून पडणाऱ्या विजेबद्दल आहे. "हीन स्वर" म्हणण्याचं कारण त्याची कंपनसंख्या साधारण मानवांच्या संवादाच्या कंपनसंख्येपेक्षा वेगळी आहे.

दुसरं कडवं - सूर्यावरच्या गुहामधली सावली (ही केवळ एक कल्पना आहे) ही ज्याप्रमाणे सूर्यावरच्या तप्तपणाशी अजाण असते, त्याप्रमाणे ह्या वेली वातावरणाच्या बदलांपासून (पावसाची चाहूल लागली आहे ह्या वस्तुस्थितीबाबत) अजाणत्या आहेत, पण त्या बदलांना प्रतिक्रिया म्हणून त्या अजाणतेपणी पृथ्विपतीच्या कुरणांवर विहरू लागतात.

तिसरं कडवं - ह्या तप्त भूमीला, त्याच्या वेगवेगळ्या झालेल्या घटकांना प्रयत्ने एकत्र करण्यासाठी (ज्याप्रमाणे कितीही प्रयत्न करूनही जरासंधाचे धड वेगळे करता येत नसे, इतकी एकरूपता आणण्यासाठी) हिरवा रंग सरसावून येतो.

शेवटच्या कडव्याचा अर्थ सरळ आहे. तो बऱ्याच जणांना कळला असेल. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर वाचा.

आणिक एक सहदेवा, तुझ्या कौतुकानी मी बाष्पगद्गदित झालो आहे. तुझ्या प्रतिक्रियेमधे तू अमृत नामक वल्ली/लेखक म्हणून जे काही लिहिलं आहे, ते भारी, पण तू त्याच्या (जमल्यास) स्वरचित कविता वाच. त्या भारी आहेत. बाकी आम्ही सगळे त्याचे यमकांचे पाढे रोजच सहन करत असतो, त्यामुळे तो चांगल्या कविता करत असेल ह्यावर, त्या कविता वाचेपर्यंत आम्हालाही विश्वास नव्हता.

@अमृत - सॉरी :-)

@ विशाल, मेघना - आभारी आहे. मला तर कवितेपेक्षा जुगलबंदीच आवडली.

Popular posts from this blog

कोल्हे-कुई

कषाय-दान