Posts

Showing posts from July, 2012

हलकल्लोळ - २ (आकाशके उस पार भी आकाश है)

Image
(फिजिक्समध्ये wavelength साठी 'लॅम्बडा' हे ग्रीक अक्षर का वापरतात? कदाचित एखादी wave  किती 'लांबडी ' आहे याचं ते द्योतक आहे.) (पार्श्वभूमीकरिता हलकल्लोळ भाग -१  वाचा) मागच्या भागात आपण मँडेलब्रॉटची शंका वाचली, 'ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्याची नक्की लांबी किती?' आता एक प्रात्यक्षिकच पाहू. वर दिलेल्या आकृतीमध्ये डावीकडे ती लांबी मोजण्यासाठी २०० कि.मी. लांबीची पट्टी वापरली आहे, तर उजवीकडे ५० कि.मी. लांबीची पट्टी. डावीकडच्या पट्टीने मोजल्यास एकूण लांबी २४०० किलोमीटर भरते तर उजवीकडच्या पट्टीने मोजल्यास ती ३४०० किलोमीटर भरते. इथे आपल्या डोळ्यांना सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे कि २०० किमी ची पट्टी बरीच वळणे, ओबड-धोबडपणा पाहू शकत नाही. आता आपण पट्टी आणखी छोटी करत गेलो, तर आणखीन छोटी छोटी नागमोडी वळणे आपण मोजू शकू. पट्टी जितकी छोटी तितके जास्त डीटेल्स आपल्याला कळतील आणि एकूण लांबीचा आकडा तितकाच जास्त फुगत जाईल. दूर यानातून आपल्याला जितकी लांबी मोजता येईल, त्यापेक्षा जास्त लांबी समुद्र-किनाऱ्यावर चालत फिरणारा माणूस मोजू शकेल. त्याही पेक्षा जास्त लांबी ए...

हलकल्लोळ - १ (उपोद्घात)

Image
"म्हणे कि सगळ्या गोंधळातून ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली; ते सगळं ठीके, पण पहिल्यांदा गोंधळ कुणी निर्माण केला?" मागच्या वर्षी जयेशने मला 'केऑस्' ह्या नावाचं पुस्तक दिलं. का कुणास ठाऊक, पण अनेक दिवस माझी समजूत अशी होती की केऑस् हा विषय अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सशी निगडीत असावा. जयेशनी थोडीफार कल्पना दिली होती, पण ते पुस्तक उघडण्याची इच्छा अनेक दिवस मला झाली नाही. (पुस्तक मुखपृष्ठ छायाचित्र सौजन्य -  http://www.midshelf.com/ProductSummary.aspx?P=9780749386061  ) अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो. विज्ञानाच्या सर्वच अभ्यासूंनी आवर्जून वाचावं असं ते पुस्तक आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल, घटनांबद्दल, भूगोलाबद्दल, शरीरशास्त्राबद्दल आणि अश्या आणखीन कितीतरी विषयांबद्दल ह्या केऑस् थियरीला काही म्हणायचं आहे. त्यामुळे विज्ञानाचे अभ्यासक नसणाऱ्या परंतु आवड असणाऱ्या वाचकांनाही आवडेल असं हे पुस्तक आहे. केऑस् थियरीचा गोष्टीरूप इतिहास यात आहे. अनेक रंगी-बेरंगी आकृ...