साहित्य-चौर्य झालेल्या लेखांबद्दल
दोस्तहो, माझे काही लेख पूर्वी साहित्य-चौर्य होऊन इतस्तत: पसरले आणि त्याबद्दल काहीतरी पावले उचलता यावीत यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी खाली चोरी झालेल्या लेखांचे काही ठराविक परिच्छेद दिले आहेत जे वाचून तुम्हाला कदाचित ते लेख पाहिले असल्यास सहज आठवतील आणि मला तुमच्या कडून अपेक्षित असलेली मदत म्हणजे जिथे तुम्हाला हे लेख आढळतील त्या खाली माझे नाव नसल्यास त्या लेखकाला तसे लिहिण्याबद्दल कळवणे व शक्य झाल्यास मला ती लिंक पाठवणे. एकूण चोरीला गेलेले लेख - ३ . कधी पहिल्यांदा चोरीला गेले? - २००९-२०१० च्या आसपास. कुठे कुठे आढळले - इमेल, फेसबुक, whatsapp, ब्लॉग, ऑर्कुट इत्यादी. चोरीला गेलेल्या लेखांची प्रसिद्ध शीर्षके - "मराठी भाषेची ताकद", "क कसा करतो कमाल", "पंतपुराण" इत्यादी. खाली त्या ३ लेखातील निवडक परिच्छेद आहेत: लेख १ - पोपटपंची १ परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत ...