Posts

Showing posts from May, 2020

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

Image
लहानपणी माझी अशी समजूत होती की ' केतकी गुलाब जुहि ' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो. आता ही वैयक्तिक गडबड सोडली तरी तानसेनाबद्दल उपलब्ध माहितीच्या बाबतीत एक सार्वजनिक गडबडच आहे. त्याच्या खऱ्या माहितीबरोबर अनेकविध आख्यायिका त्याच्या नावाशी इतक्या गुंफल्या गेल्या आहेत, की त्यातून सत्य शोधणं हे कोविड१९चा मूळ रोगी शोधण्याइतकं अवघड झालं आहे. ह्या गडबडींची सुरुवात अगदी तानसेनाच्या जन्मतारखेपासून, किंवा त्याहीपेक्षा विचित्र म्हणजे त्याच्या नावापासूनच आहे. तानसेनाच्या जन्मतारखेबद्दल केवळ दुमत नसून त्रिमत, चौमत वगैरे आहेत. काही उल्लेखांनुसार त्याचा जन्म इ.स...