Posts

निबंध - मासे

An initiative by my friend Amrut Amrut wrote - 'मासे' आणि 'उमासे' हे शब्द जवळचे आहेत..उवांच्या विश्वात माश्याला 'उमासे' म्हणत असावेत. मासे पाण्यात राहतात..ते पाण्याखाली बुडलेले असतात तरी त्यांना पोहता येते..पुण्यात मासे उगाच भाव खातात..भाव खाणार्या माशांना 'भाव' करून (घासाघीस करून) विकत घेऊन खातात.पुण्यातील लोक भाव खाण्याचे कारण त्यांनी खाल्लेले 'भाव खाणारे मासे' हेच आहे..!! माश्यांना पेटीत बंद करू नये.पोटात बंद करावे .!!! असे कुणीसे म्हटले आहे..असो.. काही मासे बारीक असतात काही मासे जाड असतात..जाड माणसानी बारीक मासे खाऊ नयेत..त्याना कौम्प्लेक्स येतो..(त्यांना म्हणजे माशांना)..मासे हसत नाहीत कारण हसले तर नका तोंडात पाणी जाते..!!! मासे आणि ससे हे यमकाचे शब्द आहेत..पण ससे माश्यांपेक्षा भित्रे असतात..भित्रा तो ससा आणि पाण्यात राहतो मासा!! ..बंगाल ला माश्यांची दफन-भूमी म्हणातात.आई-मासा बाळ-माश्याला बागुलबुवाची नाही बंगालची भीती दाखवते..मासा आणि माशी हे दोन वेगळे प्रकार आहेत..माश्यांवर माशी बसली आणि तेच मासे खाल्ले तर रोग पसरतात.म्हणून माश्यांना माश...

मला इन्फेक्शन होऊ नये म्हणून

(मी 'छंदाग्रही' असल्यामुळे र्‍हस्व-दीर्घाची थोडी मोकळिक घेतली आहे. कृपया सहन करणे.) चंद्र तो झाकोळलेला रात्र नव्हती संपली चांदण्यांची तेज-वर्षा या नभी आरंभली वेचताना तेज-गारा त्या तिला, मी पाहिले हे बघू की ते बघू हे प्रश्न मागे राहिले घेत ती होती तशी आस्वाद थंडीचा तिथे वाटले मजला कधी अंधार ऐसा ना फिटे पाहता मुखडा तिचा अन् केस ते ही मोकळे नाक होते लालबुंद परि जाहले सर्दीमुळे मी म्हणालो, 'हाय थंडी केवढी आहे पहा' ती म्हणाली, 'तेच ना, सर्दी मला झाली पहा' मी म्हणे, 'परि आज खूपच गारठा आहे भला, गारठ्यातच होय सर्दी-ताप-पडसे-खोकला गारठ्यातच आपुल्या शरिरा जपाया ते हवे, अमृतांजन एक असते नेहमी माझ्या सवे' 'दे मला दे अमृतांजन, चोळुनी घेते जरा' मागता ऐसे तिने मी मन्मनी म्हणलो, "मरा!" नाटकी भावात मी आणून हसणे कोरडे, 'नाहि ते माझ्याकडे' म्हणलो असे तिचिया पुढे 'काय कैसा शिष्ठ आहे!' भाव ऐसा आणुनी 'बाय्, मी जाते दुकानी, पाहते 'ते' आणुनी' पाठम्होर्‍या त्या तिला पाहून, मज मी टोकले, अमृतांजन मम तिला...

कोल्हे-कुई

(हे लेखन कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, माझ्याही नकळत कोणीतरी ढकलपत्रांमध्ये (इ-मेल) तसंच्या तसं कॉपी केलेलं मला आढळलं आहे. (कोणीतरी मलाच माझी ही कथा मेल केली). मी माग काढत गेलो तेव्हा ते IIT Bombay मधून पसरल्याचं समजलं. ही कथा संपूर्णपणे माझी स्वत:ची आहे याची नोंद घ्यावी.) ( पोपटपंचीला पुष्कळ प्रसिद्धी पावल्यानंतर पूर्व-प्रसिद्ध कोल्हापूरच्या काका-काकूंची कथा किंचित कष्ट करून कंप्लीट केलीये.) केशवाचे कपट, काकांची कमाल केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचर्‍यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला. काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. क...

पोपटपंची - २

(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.) पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण (पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पोपटपंची - 1) पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला. पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले. पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून...

पोपटपंची - १

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला. पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच...

7-8-9

नुकतंच मिसळपाववर (www.misalpav.com) सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९. हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही. खूप कमी कालावधीत (माझ्या परिचयातील लोकांत) लोकप्रिय झालेला हा खेळ. त्याच्याबद्दल इथे देखिल लिहिण्याचा मोह अनावर झाला आहे. एखादा खेळ प्रत्यक्ष खेळून दाखवूनच शिकवावयास हवा. तो कसा खेळायचा हे वाचणं कंटाळवाणेपणाचं होईल, हे मला माहित आहे. पण तरीदेखिल मी हे देत आहे. सध्या मिपावर,मनोगतावर, उपक्रमवर तसंच अन्य काही वेब साईट्स वर, टिव्हीवर, पुस्तकांमध्ये काही काही पदार्थांच्या पाककृती लिहिल्या जात आहेत. त्याप्रमाणे क...

आम्ही कोण

आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरीं- वरती पुन्हा एकदा पादाक्रान्त करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (आमची प्रेरणा- केशवसुतांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके" आणि केशवकुमारांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी")