Posts

आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन

Image
लहानपणी माझी अशी समजूत होती की ' केतकी गुलाब जुहि ' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो. आता ही वैयक्तिक गडबड सोडली तरी तानसेनाबद्दल उपलब्ध माहितीच्या बाबतीत एक सार्वजनिक गडबडच आहे. त्याच्या खऱ्या माहितीबरोबर अनेकविध आख्यायिका त्याच्या नावाशी इतक्या गुंफल्या गेल्या आहेत, की त्यातून सत्य शोधणं हे कोविड१९चा मूळ रोगी शोधण्याइतकं अवघड झालं आहे. ह्या गडबडींची सुरुवात अगदी तानसेनाच्या जन्मतारखेपासून, किंवा त्याहीपेक्षा विचित्र म्हणजे त्याच्या नावापासूनच आहे. तानसेनाच्या जन्मतारखेबद्दल केवळ दुमत नसून त्रिमत, चौमत वगैरे आहेत. काही उल्लेखांनुसार त्याचा जन्म इ.स...

Self-Similarity Part-1

Image
Original Marathi posts:  हलकल्लोळ - १  and  हलकल्लोळ - २  combined into one. English translation by Amita Joshi . Have you ever thought, how eerily we associate definite shapes to all the objects? Our houses are always quadrangular, so are our books. Our computers too are of a definite shape. Everywhere everything is either quadrangular, triangular or circular. But is the natural earth surface so uniform? Absolutely not. It is uneven and bobbing. Nevertheless, we human beings do put extra efforts to make it levelled. We level deep pits, Weather Mountains and erode them physically. But this is something unnatural. None of the nature’s creations fits into these standard shapes. Which mountain is perfectly triangular or conical? Are clouds restricted to a specific shape? Never. Neither do our body parts have any of these explicit forms. Hardly any of these irregular forms is covered in theoretical geometry. In the efforts of simplifying everything...

कायप्पापुरीतील ओव्या

(कायप्पा (WhatsApp) वरून आलेल्या एका चित्रावरून रचलेल्या ओव्या. त्यात गर्दी मध्ये एक जण पुस्तक वाचत आहे आणि असा दुर्मिळ प्राणी बघून इतर सर्व त्याच्यासोबत सेल्फी काढत आहेत असा देखावा होता. मूळ चित्रकार माहित नसल्याने प्रताधिकार कारणास्तव ते चित्र इथे डकवले नाही.) इये थोपु आजि। कायप्पा नगरी। महारम्यपुरी। व्हर्चुअल।। व्हर्चुअलामाजी। रमती हो प्राणी। व्हर्चुअल वाणी। वदती ते।। धुंडोनी कॉन्टॅक्ट। वदती एकाशी। किंवा समूहाशी। अहर्निश।। अहर्निश तैसे। कला नि साहित्य। करी फक्त नित्य। फॉरवर्ड।। फॉरवर्ड लोक। फॉरवर्ड ब्लॉक। फॉरवर्ड क्लॉक। होत असे।। ऐशा प्राणियांच्या। वदू काय कळा। वाचक विरळा। परि तेथ।। वाचक दिसता। प्राणी होती गोळा। आश्चर्यसोहळा। आत्यंतिक।। शंत्या म्हणे द्यावे। हेचि दान देवा। वाचनाचा व्हावा। ना विसर।। - शंतनु भट (३०/१०/२०१७)

विज्ञान संशोधनातील इंग्रजीची मक्तेदारी

सध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का?' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते. तेव्हा विज्ञान संशोधनात लेखांचे महत्त्व आणि त्या अनुषंगाने भाषेचे महत्त्व काय ते आपण पाहू, म्हणजे ह्यात इंग्रजीने काय मक्तेदारी राखली आहे हे दिसून येईल. सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक संशोधक काही न्यूटन/आइनस्टाईन नसतो. किंबहुना सध्या जगात 'संशोधक' असा किताब लावणारे लाखो असतील; त्यांच्या सगळ्यांच्याच संशोधनाचा परिणाम काही जग हलवून टाकणारा नसतो. परंतू त्यांनी अभ्यासलेल...

साहित्य-चौर्य झालेल्या लेखांबद्दल

दोस्तहो, माझे काही लेख पूर्वी साहित्य-चौर्य होऊन इतस्तत: पसरले आणि त्याबद्दल काहीतरी पावले उचलता यावीत यासाठी प्रयत्न चालू आहेत. मी खाली चोरी झालेल्या लेखांचे काही ठराविक परिच्छेद दिले आहेत जे वाचून तुम्हाला कदाचित ते लेख पाहिले असल्यास सहज आठवतील आणि मला तुमच्या कडून अपेक्षित असलेली मदत म्हणजे जिथे तुम्हाला हे लेख आढळतील त्या खाली माझे नाव नसल्यास त्या लेखकाला तसे लिहिण्याबद्दल कळवणे व शक्य झाल्यास मला ती लिंक पाठवणे. एकूण चोरीला गेलेले लेख - ३ . कधी पहिल्यांदा चोरीला गेले? - २००९-२०१० च्या आसपास. कुठे कुठे आढळले - इमेल, फेसबुक, whatsapp, ब्लॉग, ऑर्कुट इत्यादी. चोरीला गेलेल्या लेखांची प्रसिद्ध शीर्षके - "मराठी भाषेची ताकद", "क कसा करतो कमाल", "पंतपुराण" इत्यादी. खाली त्या ३ लेखातील निवडक परिच्छेद आहेत: लेख १ - पोपटपंची १ परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत ...

अतिपरिचयात्...

सध्या सार्वजनिक बोली भाषेमध्ये काही जणांना आपण काही विशेष शब्द वापरत आहोत ह्याचं खूप विशेष वाटत असतं. त्यामुळे ते असे विशेष शब्द इतक्या विशेषत् वाने वापरतात की त्यांची विशेषता कमी होऊन ते सामान्य होऊन जातात. आता, उदाहरणार्थ 'कुठेतरी' हा शब्द घ्या. सामान्यपणे हा शब्द स्थलवाचक आहे. पण सार्वजनिकपणे बोलणाऱ्यांना इतक्या साधेपणे हा शब्द वापरणं अजिबात मंजूरच नाहीये. एखादा वक्ता तावातावाने आपले विचार मांडताना श्रोत्यांच्या भावनांना हात घालतो आणि म्हणतो, 'मग हे सगळं असं चालू असताना आपलंही काही कर्तव्य आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा'... किंवा 'अमुक अमुक असं जेव्हा घडतं तेव्हा कुठेतरी सांगावंसं वाटतं की....' किंवा '.... असं आपल्या मनाला जेव्हा कुठेतरी जाणवतं तेव्हा....'. कधी कधी एखादा कवी देखील लिहून जातो की 'हृदयात कुठेतरी हलल्यासारखं वाटतं'. ह्या मंडळींना कदाचित वाटत असावं की ह्या 'कुठेतरी' शिवाय पाहिजे ते गांभीर्य वाक्याला येणार नाही. कुठेतरी मध्ये ठिकाणाबद्दल एक अनिश्चितता आहे, तर काही जणांना ठिकाणाची निश्च...

हलकल्लोळ - ७: मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत?

Image
(लसिथ मलिंगाने केली तर ती राउंड आर्म अ‍ॅक्शन आणि आम्ही केली तर ती फेकी बॉलिंग काय!) (पार्श्वभूमीकरिता भाग-५ आणि भाग-६ वाचल्यास बरे!) मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की प्राणी हे वेगवेगळ्या आकाराचे (size) असताना निसर्गाने त्यांना वेगवेगळं रूप (shape) कसं दिलं आहे, किंवा त्यांना वेगवेगळ्या रूपांची का आवश्यकता आहे. पण आपल्याला कधी असा प्रश्न पडतो का, की या वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यांना आजुबाजूचं विश्व हे आपल्याला दिसतं तसंच दिसतं का? त्यांना हालचालीसाठी तेवढेच कष्ट पडतात का जेवढे आपल्याला पडतात? अगदी सगळ्या गोष्टींची उत्तरं मलाही माहित नाहीत, पण यातल्या काही विषयांवर आपण गप्पा मारू. कदाचित त्यातून काही उत्तरं समजतील, काही सुचेल! मागच्या भागात ज्या हॅल्डेन काकांबद्दल आपण वाचलं, त्यांनी अश्या प्रकारचा अभ्यास केला होता. त्यांच्या प्रमाणे 'स्टीवन व्होगल' हा असाच एक संशोधक. सध्या तो ड्युक विद्यापीठ (अमेरिका) येथे जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याने लिहिलेली काही पुस्तकं खूप मस्त आहेत. त्यातलं 'Life's devices - The physical world of animals and plants' ...