विष्णुगुप्त २
(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे." इथून पुढे - ) त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक...