Posts

विष्णुगुप्त - ३

( भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे - "विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे. किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण!" "खरंच रे!" विष्णु मिठी सोडवत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मगध सोडलंत, आणि आम्ही एकटे पडलो." "त्या नीच धनानंदाच्या कारभाराला कंटाळून. सर्व-सामान्यांना जगणंच कठीण करून ठेवलं आहे त्यानं. फक्त पाटलीपुत्रच नाही, तर मगधाच्या खेडोपाड्यात राहणार्‍या आचार्यांनाही स्थलांतर करावं लागलं आहे." "ठाऊक आहे मला. तुम्ही पाटलीपुत्र सोडलंत, पण तुमची कुशलवार्ता मला अजेय कडून कळत होती. शिवाय तक्षशिला ही तर ज्ञानभूमी आहे. इथे तुम्हाला चिंतेचं काही कारण नसावं." "खरं आहे. पण पाटलीपुत्र ते तक्षशिला हा प्र...

कल्पनेतली ती

तुझ्या कल्पने जाहली खल्बली अन् नजर ती तुझी मखमली काहिशी तुला पाहता वाहता शीतळी अन् - तरी जाहली काहिली ही अशी तुझी सावली पावली मावली अन् पुढे धावली कावली ती किती मला अंगणी पाहुनी थांबली अन् क्षणार्धात ती होतसे चोरटी तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने किती सांग मी तेथ धाडायची? तुझा चेहरा चंद्र नसला तरीही तुझ्या भोवती तीच हिंडायची कशाला फुकाची कुणाच्या मनाची भिती किल्मिषांची उरी घ्यायची? खुली रंगवू या आकाशात नक्षी गुजे सावकाशीत सांगायची

तो आणि त्याची स्वप्नं

अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर हो हो, जरा डोळे बंद कर डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्‍यात तूच कधीतरी गोंदवलेलं त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू अरे तू फक्त सांग, तुला पाहिजे तसं घडेल तुझ्या खिडकीचं दार कदाचित दूरवरच्या गुहेत उघडेल त्या गुहेमध्ये अश्याच स्वप्नाळू लोकांची वस्ती आहे बाहेर काहीही घडो, त्यांना कुणाची धास्ती आहे? चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू ते बघ, तो पहिलास का? तिकडे एक निळा डोंगर आहे त्याच्याकडे जाणारी ती पायवाटसुद्धा किती ...

विष्णुगुप्त २

(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे." इथून पुढे - ) त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक...

कषाय-दान

(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान) आता खाद्यात्मके देवे, येणे खाद-यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे, कषाय-दान हे| जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनाची गती वाढो पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे| मधुमेह्यांचा मेद जावो, विश्व सदुग्ध-कषाये पिवो जो जें वांछील तो ते लाहो, मानव-जात| वर्षत सकळ मंगळी, चहाबाजांची मांदियाळी भरभरून पात्रान्तरी, देत तू चहा| चला चहापत्तींचे आरव, आसामातले जणू ते गाव बोलते जें अर्णव, कषायांचे| वेलची आल्याचे चूरण, मिसळून करी जें प्राशन ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु| किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती अथवा कोरा चहा पिती, अखंडित| आणि कषायोपजीविये, विशेषी लोकी इये घोटा घोट विजये, होआवे जी| येथ म्हणे श्री खाद्येश्वरावो, हा होईल दान कषायो येणे वरे हा शंतनो, तवाना जाला|

पहिले अक्षर

ए-काएकी कुठून कैशी क-ल्लोळातुन उमटे ऐशी ही-न स्वरांची शुभ्र रेष ती अ-जाणत्या त्या विहरी वेली क्ष-त्रपतीच्या कुरणावरुनी र-विकुहरातील बनुनी छाया स-रसावुनी मग येई रावा म-रुभूमीकणघृत रगडाया ज-राजीर्ण त्या जरासंध-सम ल-चके समस्त एकवटाया ना-द जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा शब्दार्थ - विहरी - विहरण करतात क्षत्रपती - पृथ्वीपती घृत - तेल प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीतील अधर दिशेने - (वरून) खालच्या दिशेने बोधे - समजून - शंतनु भट

निबंध - मासे

An initiative by my friend Amrut Amrut wrote - 'मासे' आणि 'उमासे' हे शब्द जवळचे आहेत..उवांच्या विश्वात माश्याला 'उमासे' म्हणत असावेत. मासे पाण्यात राहतात..ते पाण्याखाली बुडलेले असतात तरी त्यांना पोहता येते..पुण्यात मासे उगाच भाव खातात..भाव खाणार्या माशांना 'भाव' करून (घासाघीस करून) विकत घेऊन खातात.पुण्यातील लोक भाव खाण्याचे कारण त्यांनी खाल्लेले 'भाव खाणारे मासे' हेच आहे..!! माश्यांना पेटीत बंद करू नये.पोटात बंद करावे .!!! असे कुणीसे म्हटले आहे..असो.. काही मासे बारीक असतात काही मासे जाड असतात..जाड माणसानी बारीक मासे खाऊ नयेत..त्याना कौम्प्लेक्स येतो..(त्यांना म्हणजे माशांना)..मासे हसत नाहीत कारण हसले तर नका तोंडात पाणी जाते..!!! मासे आणि ससे हे यमकाचे शब्द आहेत..पण ससे माश्यांपेक्षा भित्रे असतात..भित्रा तो ससा आणि पाण्यात राहतो मासा!! ..बंगाल ला माश्यांची दफन-भूमी म्हणातात.आई-मासा बाळ-माश्याला बागुलबुवाची नाही बंगालची भीती दाखवते..मासा आणि माशी हे दोन वेगळे प्रकार आहेत..माश्यांवर माशी बसली आणि तेच मासे खाल्ले तर रोग पसरतात.म्हणून माश्यांना माश...