Posts

हलकल्लोळ - २ (आकाशके उस पार भी आकाश है)

Image
(फिजिक्समध्ये wavelength साठी 'लॅम्बडा' हे ग्रीक अक्षर का वापरतात? कदाचित एखादी wave  किती 'लांबडी ' आहे याचं ते द्योतक आहे.) (पार्श्वभूमीकरिता हलकल्लोळ भाग -१  वाचा) मागच्या भागात आपण मँडेलब्रॉटची शंका वाचली, 'ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्याची नक्की लांबी किती?' आता एक प्रात्यक्षिकच पाहू. वर दिलेल्या आकृतीमध्ये डावीकडे ती लांबी मोजण्यासाठी २०० कि.मी. लांबीची पट्टी वापरली आहे, तर उजवीकडे ५० कि.मी. लांबीची पट्टी. डावीकडच्या पट्टीने मोजल्यास एकूण लांबी २४०० किलोमीटर भरते तर उजवीकडच्या पट्टीने मोजल्यास ती ३४०० किलोमीटर भरते. इथे आपल्या डोळ्यांना सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे कि २०० किमी ची पट्टी बरीच वळणे, ओबड-धोबडपणा पाहू शकत नाही. आता आपण पट्टी आणखी छोटी करत गेलो, तर आणखीन छोटी छोटी नागमोडी वळणे आपण मोजू शकू. पट्टी जितकी छोटी तितके जास्त डीटेल्स आपल्याला कळतील आणि एकूण लांबीचा आकडा तितकाच जास्त फुगत जाईल. दूर यानातून आपल्याला जितकी लांबी मोजता येईल, त्यापेक्षा जास्त लांबी समुद्र-किनाऱ्यावर चालत फिरणारा माणूस मोजू शकेल. त्याही पेक्षा जास्त लांबी ए...

हलकल्लोळ - १ (उपोद्घात)

Image
"म्हणे कि सगळ्या गोंधळातून ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली; ते सगळं ठीके, पण पहिल्यांदा गोंधळ कुणी निर्माण केला?" मागच्या वर्षी जयेशने मला 'केऑस्' ह्या नावाचं पुस्तक दिलं. का कुणास ठाऊक, पण अनेक दिवस माझी समजूत अशी होती की केऑस् हा विषय अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सशी निगडीत असावा. जयेशनी थोडीफार कल्पना दिली होती, पण ते पुस्तक उघडण्याची इच्छा अनेक दिवस मला झाली नाही. (पुस्तक मुखपृष्ठ छायाचित्र सौजन्य -  http://www.midshelf.com/ProductSummary.aspx?P=9780749386061  ) अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो. विज्ञानाच्या सर्वच अभ्यासूंनी आवर्जून वाचावं असं ते पुस्तक आहे. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल, घटनांबद्दल, भूगोलाबद्दल, शरीरशास्त्राबद्दल आणि अश्या आणखीन कितीतरी विषयांबद्दल ह्या केऑस् थियरीला काही म्हणायचं आहे. त्यामुळे विज्ञानाचे अभ्यासक नसणाऱ्या परंतु आवड असणाऱ्या वाचकांनाही आवडेल असं हे पुस्तक आहे. केऑस् थियरीचा गोष्टीरूप इतिहास यात आहे. अनेक रंगी-बेरंगी आकृ...

निबंध: गाय - व्याकरणिक दृष्ट्या उपयुक्त पशु

खरं तर विषय 'माझा आवडता प्राणी - गाय' हा आहे, परंतु ते संशोधन अगोदर प्रकाशित झाल्यामुळे (Review by  Pandit V., 2012) तसलंच संशोधन वेगळ्या नावाखाली प्रकाशित करायचा हा खटाटोप. ह्यातील काही कल्पना Pandit V., Pundalik R., Kher A., Kane M., Pranajape C. यांच्याकडून घेतल्या आहेत त्यांचे सुरवातीच्या बिगिनिंगमदी यक्नोलेज्मेंटला आभार मानतो. आता गाय आणि व्याकरण या विषयांकडे वळूया. गाय हा शब्द संस्कृतातील 'गौ' या शब्दावरून आला असा प्रवाद अनेक वर्षे प्रचलित आहे (Kane M.). किंबहुना बऱ्याच प्राण्यांची नावे संस्कृतातून आल्याचा दावा लोक करतात. पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. कारण विविध भाषांचा अभ्यास करता असं लक्षात येईल कि इंग्रजीमधील 'GUY' ह्या शब्दाचा उच्चार गायीशी सगळ्यात जवळचा आहे (Pandit V.). संस्कृतमध्ये गौ मधल्या 'औ' चे रुपांतर 'आव' असे होते हि गोष्ट हि मंडळी सोयीस्करपणे विसरतात. तर हा शब्द इंग्रजीमधून आला असून तिकडे मुलांना गाय म्हणण्याचे कारण पूर्वी तिकडे गाय ह्या पशूचे पालन होत असे. सकाळी सकाळी गवळी गोठ्यात जाऊन गायींना 'Hi guy...

विष्णुगुप्त - ३

( भाग २ मध्ये - "विष्णु... अरे विष्णुगुप्त...." ह्या हाकेने विष्णु एकदम भानावर आला. मागे वळून बघितलं तर एक विद्यार्थी त्याच्या दिशेने धावत येत होता. चेहराही ओळखीचा वाटत होता. तेवढ्यात नेत्रांना नेत्रांची ओळख पटली. भावनावेगात दोघेही एकमेकांवर कडकडून आदळले. त्या विद्यार्थ्याला मिठी मारत विष्णु म्हणाला"इंदुशर्मा, किती रे बदललास!!") पासून पुढे - "विष्णु... मला विश्वासच बसत नाहीये की आपली भेट इथे होते आहे. किती वर्षांनंतर भेटतो आहोत आपण!" "खरंच रे!" विष्णु मिठी सोडवत म्हणाला, "तुम्ही सर्वांनी मगध सोडलंत, आणि आम्ही एकटे पडलो." "त्या नीच धनानंदाच्या कारभाराला कंटाळून. सर्व-सामान्यांना जगणंच कठीण करून ठेवलं आहे त्यानं. फक्त पाटलीपुत्रच नाही, तर मगधाच्या खेडोपाड्यात राहणार्‍या आचार्यांनाही स्थलांतर करावं लागलं आहे." "ठाऊक आहे मला. तुम्ही पाटलीपुत्र सोडलंत, पण तुमची कुशलवार्ता मला अजेय कडून कळत होती. शिवाय तक्षशिला ही तर ज्ञानभूमी आहे. इथे तुम्हाला चिंतेचं काही कारण नसावं." "खरं आहे. पण पाटलीपुत्र ते तक्षशिला हा प्र...

कल्पनेतली ती

तुझ्या कल्पने जाहली खल्बली अन् नजर ती तुझी मखमली काहिशी तुला पाहता वाहता शीतळी अन् - तरी जाहली काहिली ही अशी तुझी सावली पावली मावली अन् पुढे धावली कावली ती किती मला अंगणी पाहुनी थांबली अन् क्षणार्धात ती होतसे चोरटी तुझ्या दर्शनाला नभी चंद्रयाने किती सांग मी तेथ धाडायची? तुझा चेहरा चंद्र नसला तरीही तुझ्या भोवती तीच हिंडायची कशाला फुकाची कुणाच्या मनाची भिती किल्मिषांची उरी घ्यायची? खुली रंगवू या आकाशात नक्षी गुजे सावकाशीत सांगायची

तो आणि त्याची स्वप्नं

अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर हो हो, जरा डोळे बंद कर डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्‍यात तूच कधीतरी गोंदवलेलं त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू अरे तू फक्त सांग, तुला पाहिजे तसं घडेल तुझ्या खिडकीचं दार कदाचित दूरवरच्या गुहेत उघडेल त्या गुहेमध्ये अश्याच स्वप्नाळू लोकांची वस्ती आहे बाहेर काहीही घडो, त्यांना कुणाची धास्ती आहे? चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू ते बघ, तो पहिलास का? तिकडे एक निळा डोंगर आहे त्याच्याकडे जाणारी ती पायवाटसुद्धा किती ...

विष्णुगुप्त २

(पार्श्वभूमीकरिता वाचा - विष्णुगुप्त १) (मागच्या भागात - चालता चालता विष्णू नगराच्या बर्‍यापैकी बाहेरच्या बाजूला आला. त्याला आता बाकी कशाचं भानच राहिलं नव्हतं. आता त्याला समोर दिसत होतं ते फक्त एक मोठ्ठं प्रवेशद्वार आणि त्याच्यापुढे दाट झाडीतून गेलेली एक छोटीशी पायवाट. भराभर पावलं टाकत तो त्या प्रवेशद्वारापाशी येऊन थबकला. त्याला पाहून द्वारपालांनी त्याला हटकलं, "काय रे, काय नाव तुझं?". पण विष्णूचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. समोरच्या दाट झाडीतून पलिकडे दूरवर तिमजली इमारतीच्या दिसणार्‍या एका कळसाकडे तो टक लावून बघत होता. द्वारपालांच्या त्या प्रश्नावर त्याच्याही नकळत त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या, अभावितपणे ओठ उघडले आणि शब्द बाहेर पडले, "माझं नाव 'चाणक्य'. मी मगध देशातून इथे उच्चशिक्षणासाठी आलो आहे." इथून पुढे - ) त्या द्वारपालाने पुन्हा एकदा त्याला नीट न्याहाळलं, आणि विचारलं, "तुझी अभिज्ञान-मुद्रा?" या प्रश्नावर विष्णु एकदम चमकला, आणि पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं त्याने कनवटीला हात घातला, आणि आपल्या धोतराची, कमरेजवळ वळवलेली एक घडी उलगडून एक...