पोपटपंची - २


(पंतांच्या पगडीच्या प्रवासवर्णनावरील पावमिसळकरी प्रतिभावंतांच्या प्रतिसादांनी प्रेरणा पावून पुढचा पार्ट प्रसवला.)

पार्ट २ - पंकजचं प्रेम-प्रकरण

(पूर्वसूचना- पार्श्वभूमीकरिता पहा: पोपटपंची - 1)

पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.

- (पटकथा - पुष्कर ऊर्फ शंतनु भट)

Comments

Rohit said…
changla aahe...
pan i think the credit goes to pushkar...
kon aahe ha btw??
शंतनु said…
thanks a lot.

mich ahe to neech pushkar. ("p" varun kahi tari 'petname' nako ka?)
sahdeV said…
पुष्कराची "प"वाली पटकथा/पोपटपंची पंडिताना पसंत पडलीय... पन्क्तिरचनेसाठीची प्रदीर्घ पराकाष्ठा पोस्टमधे प्रकटतेचंय !

पुष्कराची प्रगति पाहून प्रेरित पंडितांचा पांडित्यदर्शनाचा पोरकट प्रयत्न पसंत पडल्यास(/पकल्यास :)) प्रतिक्रिया पाठवणे...

पुढच्या पोस्टच्या प्रतिक्षेत,

"पंडित"! :P

:"P"
Sagar said…
Lai mhanje Lai bhari !! "P" warun kahtari vichar karun lihinyacha hi Patience majhyat rahila nahi ... Far bhari !!

Cheers

Sagar
sahdeV said…
patience: पळवाट!
prerequisite: पात्रता! [:P]
शंतनु said…
"patience: पळवाट!
prerequisite: पात्रता! [:P]"
प्रथमदर्शनीच पसंत पडले.

पुष्करवरच्या प्रेमाखातर पंडितांनी पुरवलेली 'प्'ची पंक्तिरचना पाहिली. पण पुष्करच्या पवईतल्या प्राधिकार्‍यांच्या पोरकट प्रबंधांमुळे पुष्करच्या पोस्टसाठी प्रदीर्घ पराकाष्ठा पंडितांना पहावयास पडावी, परिणामी पुष्करच्या प्रनेत्रांपुढे प्रेमाश्रू प्रकटले.
शंतनु said…
Sagar,
Are kiti divsanni!!! thanks for the comment.
केदार said…
sahich..........
Yachich short story aikali hoti aadhi kadhitari .Pan itaki lamb story pahilyanda vachtoy...
शंतनु said…
"प्रभो राख मम लाज"

अरे माझे अनुभव, (केदार), तुला जी शॉर्ट स्टोरी ऐकल्यासारखी वाटतीये ना, ती तू कधी ऐकलीस ते मीच सांगतो. इयत्ता सातवी मध्ये. आपल्या शाळेच्या 'युवावाहिनी' की अश्याच काहीतरी नावाच्या अर्धवार्षिक पत्रात छापून आली होती. आणि गंमत म्हणजे ती मीच लिहिली होती. (ती पोपटपंची -१ मध्ये आहे). कॉलेजमध्ये आल्यावर ती अजून एक्स्पांड केली आणि त्याला पोपटपंची-२ ही जोडली. हा चोरीचा माल नाही.

मनोगत डॉट कॉम नावाच्या साईटवर अ ते ह मधील सर्व मराठी मुळाक्षरांपासून केलेलं एक एक वाक्य आहे. ग्रेट लिहिलं आहे. ते अवश्य वाच. ही पोपटपंची काहीच नाही असं वाटलं मला ते वाचल्यावर.

अशी चारचौघात लाज नको रे काढू बाबा.. :-)
(ह. घे.)

Popular posts from this blog

कोल्हे-कुई

कषाय-दान

पहिले अक्षर