मला इन्फेक्शन होऊ नये म्हणून
(मी 'छंदाग्रही' असल्यामुळे र्हस्व-दीर्घाची थोडी मोकळिक घेतली आहे. कृपया सहन करणे.)
चंद्र तो झाकोळलेला रात्र नव्हती संपली
चांदण्यांची तेज-वर्षा या नभी आरंभली
वेचताना तेज-गारा त्या तिला, मी पाहिले
हे बघू की ते बघू हे प्रश्न मागे राहिले
घेत ती होती तशी आस्वाद थंडीचा तिथे
वाटले मजला कधी अंधार ऐसा ना फिटे
पाहता मुखडा तिचा अन् केस ते ही मोकळे
नाक होते लालबुंद परि जाहले सर्दीमुळे
मी म्हणालो, 'हाय थंडी केवढी आहे पहा'
ती म्हणाली, 'तेच ना, सर्दी मला झाली पहा'
मी म्हणे, 'परि आज खूपच गारठा आहे भला,
गारठ्यातच होय सर्दी-ताप-पडसे-खोकला
गारठ्यातच आपुल्या शरिरा जपाया ते हवे,
अमृतांजन एक असते नेहमी माझ्या सवे'
'दे मला दे अमृतांजन, चोळुनी घेते जरा'
मागता ऐसे तिने मी मन्मनी म्हणलो, "मरा!"
नाटकी भावात मी आणून हसणे कोरडे,
'नाहि ते माझ्याकडे' म्हणलो असे तिचिया पुढे
'काय कैसा शिष्ठ आहे!' भाव ऐसा आणुनी
'बाय्, मी जाते दुकानी, पाहते 'ते' आणुनी'
पाठम्होर्या त्या तिला पाहून, मज मी टोकले,
अमृतांजन मम तिला तेव्हाच का नाही दिले?
होत खच्ची मी म्हणे ऐसेच होते व्हायचे,
हो न परि इन्फेक्शनाला कारणी पडसे तिचे
शक्यता "स्वाईन-फ्लू" ची मी अशी मग टाळली
"वाचलो!" ऐशा खुशीतच झोप मजला लागली
- शंतनु भट
चंद्र तो झाकोळलेला रात्र नव्हती संपली
चांदण्यांची तेज-वर्षा या नभी आरंभली
वेचताना तेज-गारा त्या तिला, मी पाहिले
हे बघू की ते बघू हे प्रश्न मागे राहिले
घेत ती होती तशी आस्वाद थंडीचा तिथे
वाटले मजला कधी अंधार ऐसा ना फिटे
पाहता मुखडा तिचा अन् केस ते ही मोकळे
नाक होते लालबुंद परि जाहले सर्दीमुळे
मी म्हणालो, 'हाय थंडी केवढी आहे पहा'
ती म्हणाली, 'तेच ना, सर्दी मला झाली पहा'
मी म्हणे, 'परि आज खूपच गारठा आहे भला,
गारठ्यातच होय सर्दी-ताप-पडसे-खोकला
गारठ्यातच आपुल्या शरिरा जपाया ते हवे,
अमृतांजन एक असते नेहमी माझ्या सवे'
'दे मला दे अमृतांजन, चोळुनी घेते जरा'
मागता ऐसे तिने मी मन्मनी म्हणलो, "मरा!"
नाटकी भावात मी आणून हसणे कोरडे,
'नाहि ते माझ्याकडे' म्हणलो असे तिचिया पुढे
'काय कैसा शिष्ठ आहे!' भाव ऐसा आणुनी
'बाय्, मी जाते दुकानी, पाहते 'ते' आणुनी'
पाठम्होर्या त्या तिला पाहून, मज मी टोकले,
अमृतांजन मम तिला तेव्हाच का नाही दिले?
होत खच्ची मी म्हणे ऐसेच होते व्हायचे,
हो न परि इन्फेक्शनाला कारणी पडसे तिचे
शक्यता "स्वाईन-फ्लू" ची मी अशी मग टाळली
"वाचलो!" ऐशा खुशीतच झोप मजला लागली
- शंतनु भट
Comments
शक्यता "स्वाईन-फ्लू" ची मी अशी मग टाळली
"वाचलो बुआ" म्हणत मी समजूत स्वथाची काढली
जमले नाही मला तेव्हा "अम्रुतान्जनाचे" चोचले
अमृतांजन नसल्याचे दुख्ख मम मनाला बोचले
"आम्बट ती द्राक्षे कोल्ह्याला" माझी आई म्हनतसे
मात्रुवचनी गूढ़ अर्थ तेव्हा मजला कलतसे
काय म्हणुनी, "काककू"ची अक्षरे रे विसरसी ? (!)
ती प्रतीक्षा संपली हे काव्य जेव्हा वाचले
"अमृता" परि कोण रे ती, खास तू हे लपविले !! (:P)
चांदण्या साठी खरे का,ती स्व-गृहाला लांबली?
चोचले हे लोचंनाचे ,मी का ,असे रे साधले..?
मी असे पाहता कसे रे , आमचे नच वाजले ?
थंडीतही भर विजेचे ,भास होते त्या तिथे
रात्र होती, तिज पाहता ,भोवतीचा तम मिटे
ती गीत होती,फुल होती,की परी, ना कळे ?
घेउनी फडके नवे ती , नाक करते मोकळे.
मी म्हणालो, 'हाय !!,ब्रांडी इकडे आहे पहा'..
ती म्हणाली, 'पेग कधीचे मी रिचवले दहा'
मी म्हणे, 'परि आज खूपच गारठा आहे भला,
अजून घे थोडी आणिक..शेक तू आपला गळा..
गारठ्यातच आपुल्या शरिरा पुराया ते हवे
बघ, एक खंबा राहतो, नेहमी माझ्या सवे'
'दे मला दे घोट दोन, ढोसुनी घेते जरा'
मागता ऐसे तिने मी झिंगलो होतो खरा..
मुलखाचे होतो बरे, आम्ही असे ते बेवडे
'तूच दे मज बाटली' ,बस म्हणालो एवढे
'काय फुकटा दारुडा हा !' भाव ऐसा आणुनी
बाटली घेऊन गेली, माझेच पैसे मारुनी..
झिंगणाऱ्या त्या तिला पाहून, मज मी टोकले,
सोबती राहून तिचिया, पेग का नच घेतले?
होत खच्ची मी म्हणे ऐसेच होते व्हायचे,
हो परि मी तिचमुळे साधले, आज नच प्यायचे.. ..
बेवडी पत्नी अशी मी,आज होती टाळली
"वाचलो!" ऐशा खुशीतच चार-पेग ढोसली
"वाचलो!" ऐशा खुशीतच चार-पेग ढोसली
hahahahahahahhaha......gadabada loltoy mee...Amrut la sashtang namaskar !
मकरंदा,
"अमृता"ला त्या परि केव्हा तसे तू पाहिले?
एकटा होतो 'तदा' ऐसेच मजला वाटले!
उत्तरातुन प्रश्न का रे? खास तुमची पॉलिसी!
सोय ना राहे कुठे नाहीच राहे 'प्राय्-व्हसी'