निबंध - मासे

An initiative by my friend Amrut

Amrut wrote -
'मासे' आणि 'उमासे' हे शब्द जवळचे आहेत..उवांच्या विश्वात माश्याला 'उमासे' म्हणत असावेत. मासे पाण्यात राहतात..ते पाण्याखाली बुडलेले असतात तरी त्यांना पोहता येते..पुण्यात मासे उगाच भाव खातात..भाव खाणार्या माशांना 'भाव' करून (घासाघीस करून) विकत घेऊन खातात.पुण्यातील लोक भाव खाण्याचे कारण त्यांनी खाल्लेले 'भाव खाणारे मासे' हेच आहे..!! माश्यांना पेटीत बंद करू नये.पोटात बंद करावे .!!! असे कुणीसे म्हटले आहे..असो.. काही मासे बारीक असतात काही मासे जाड असतात..जाड माणसानी बारीक मासे खाऊ नयेत..त्याना कौम्प्लेक्स येतो..(त्यांना म्हणजे माशांना)..मासे हसत नाहीत कारण हसले तर नका तोंडात पाणी जाते..!!! मासे आणि ससे हे यमकाचे शब्द आहेत..पण ससे माश्यांपेक्षा भित्रे असतात..भित्रा तो ससा आणि पाण्यात राहतो मासा!! ..बंगाल ला माश्यांची दफन-भूमी म्हणातात.आई-मासा बाळ-माश्याला बागुलबुवाची नाही बंगालची भीती दाखवते..मासा आणि माशी हे दोन वेगळे प्रकार आहेत..माश्यांवर माशी बसली आणि तेच मासे खाल्ले तर रोग पसरतात.म्हणून माश्यांना माशांपासून दूर ठेवावे...

My addition -
माश्यांना घाम येतो, म्हणून समुद्राचे पाणी खारट लागते.
'मासा'च्या बायकोला 'माशी' म्हणत नाहीत. कारण माशी घाणीत राहते, आणि मासे पाण्यात राहतात.
आता मासे पाण्यात राहतात म्हणून ते स्वच्छ असतात, की मासे स्वत: पाणी स्वच्छ करतात, हा संशोधनाचा विषय आहे; पण biology वाले असले संशोधन करण्याचा भानगडीत पडत नाहीत. ते म्हणतात 'शोधा म्हणजे सापडेल'. पण पाण्यात मासा शोधायला गेलो तर कदाचित 'साप' सापडेल. "डेल" कंपनीच्या सापाला 'साप-डेल' असे नाव आहे.
काही मासे वनस्पती खातात, तर काही मासे माशांनाच खातात. त्यांना 'मासाहारी' मासे म्हणतात.
काही लोक महिन्यातून एकदाच आहार घेतात. त्यामुळे संस्कृतमध्ये त्यांनाही 'मासाहारी' म्हणतात. काही जण चातुर्मासात मासा खात नाहीत.
फिलिप मासा चे आडनाव 'मासा' असल्यामुळे त्याने ऑलिंपिकमधे पोहोण्यात विक्रमी सुवर्णपदके मिळवली. माशांना पोहोण्याचा कंटाळा आला, कि ते तोंडाची उघडझाप करत बसतात. बहुतेक ती त्यांची जांभई असावी. त्याचाही कंटाळा आला, की ते परत पोहायला सुरुवात करतात.
माशांना 'मीन' असेही नाव आहे. मासे "मी-न" असल्यामुळे ते नि:स्वार्थी असण्याचा संभव आहे.
इंग्रजीमध्ये संस्कृतचे समानार्थ शिकवताना असे शिकवत

वर वर्णन केल्याप्रमाणे मासा हा खूप छान असा सजीव आहे, त्यामुळे विष्णूने पहिला अवतार म्हणून मासा decide केला.

Comments

Anonymous said…
Farach tukaar prayatna..
१ नंबर! भारी! जबरा!तोडलंस मित्रा! एकदम चाबूक!
Vishal said…
kyaa baat ! tujhe punyateel "Sahityik" mitra yaat nakkich "molachi" bhar ghalteel yachi khatri ahe :)
Makarand MK said…
"माशा"ला इतके साहित्यिक मास (mass) असेल असं कुणाला तरी वाटलं होतं काय? असो . मजा आली वाचताना ! हा अमृत कोण आहे त्याच्या blog ची लिन्क दे की.

btw तुझा ब्लॉग फक्त निमंत्रितांसाठीच आहे.नाहीतर iitb मराठी मंडळात तुला प्रसिद्ध करणार होतो. असो.
शंतनु said…
सर्वांचे आभार एकदम मानतो. मकरंदा, विशाल जे 'पुण्यातील साहित्यिक मित्र' म्हणतोय ना, त्याला तू आणि वेधस अभिप्रेत आहात. आणि विशाल, हे दोघेही पुण्याबाहेरचे, पण पुण्याचं 'पाणी' प्यायलेले आहेत.

@मकरंद, अमृत हा ह्या क्षेत्रातला दादामाणूस आहे. तो त्याच्या ब्लॉगवर लिहीत नाही. तू त्याला ऑर्कुटवर भेटू शकतोस.
kd said…
Shantanu, lihila tar chhan ahe ha "Nibanddha".. fakta mashala ghaam yeto vagaire vakyarachana karun maase khanaryanchya tondache paani palel, bara ka?!
Vishal said…
@मकरंद, अमृत हा ह्या क्षेत्रातला दादामाणूस आहे. तो त्याच्या ब्लॉगवर लिहीत नाही. मात्र दुसर्यांच्या ब्लोग्स/फोटो/ऑरकुट प्रोफाइल वर मात्र हमखास लिहितो :)
@शंतनू : आपण अमृत च्या सगळ्या रचनांचे compilation प्रसिद्ध करुया का?
शंतनु said…
vishal - chalel.. tyachya rojchya bolnyache pan karuyaat.. diwas bhar kiti sahitya prasavat asto!

Popular posts from this blog

कोल्हे-कुई

कषाय-दान

पहिले अक्षर